How To Write / Email / Blog In Marathi? मराठीत टाइप / इमेल / ब्लॉग कस करायच?

नमस्कार. हा माझा मराठीतला पहिला ब्लॉग आहे. मी मराठी शेवटच शाळेत लिहिल आणि आता १५+ वर्षांनंतर परत प्रयत्न करतो आहे. अवघड जातय पण मजा पण येतेय. पहिला मराठी ब्लॉग कशा वर लिहू असा विचार करत होतो. मग म्हटल मराठीत टाईप / ब्लॉग / इमेल कस करायच तेच लिहुया.

मराठी टायपिंग

बघितल तर मराठी टायपिंग करता येणंच महत्वाच आहे. एकदा ते जमला कि मग इमेल / ब्लॉग / लेख काहीही लिहिण सोप आहे. मराठी टायपिंग करण्या मधला मुख्य अडथळा म्हणजे अपल्या सगळ्यान कडचे इंग्रजी भाषेतले कीबोर्ड. कीबोर्ड ला मराठीत टंकलेखनयंत्र म्हणतात अस दिसतंय, पण आपण मराठी फार ताणायला नको आणि त्याला कीबोर्डच म्हणूया.

मराठी टाइप करायचा एक मार्ग म्हणजे कीबोर्ड वरच्या प्रत्येक इंग्रजी अक्षराच्या सुसंगत मराठी अक्षर पाठ करणे. DTP व्यवसायातील काही व्यक्ती हे अगदी सहज आणि कीबोर्ड कडे न बघता धडाधड मराठी टाइप करतात. पण हे तुमच्या आमच्या सारख्या क्वचित मराठी टाइप करणाऱ्या सामान्यांना जम्ण्यातल नाही.

Transliterate

दुसरा सोप्पा मार्ग आहे तो इंग्रजी मधे टाइप करायच आणि अस सॉफ्टवेअर वापरायच कि जे त्या इंग्रजीला transliterate करून मराठी करेल. मी transliterate म्हणतोय आणि translate नाही याची नोंद घ्या. Transliterate म्हणजे एका भाषेतन दुसऱ्या भाषेत अक्षरानच्या अवजानुसार भाषांतर. तुम्हाला जर मराठीत ‘खुर्ची’ लिहायच असेल तर तुम्ही इंग्रजीत ‘khurchi’ लिहायच आणि सॉफ्टवेअर आपोआप स्क्रीन वर ‘खुर्ची’ लिहील. Translate करत असतो तर आपण ‘chair’ लिहिलं असत, पण transliterate मध्ये तस नाही करत आणि ‘khurchi’ लिहितो.

इंग्राजी – मराठी transliterate साठी Google IME , Shree Lipi, Baraha आणि Lipikaar हे पर्याय आहेत. श्रीलिपी मध्ये सगळ्यात जास्ती features आहेत अस त्यांच्या संकेतस्थळावरन वाटताय तरी, पण श्रीलिपी फुकट मिळणार सॉफ्टवेअर नाही आहे. लिपिकार मध्ये पण १७ भाषान मध्ये लिहायची क्षमता आहे पण लिपिकार वरच काम थंडावलाय असा त्यांच्या संकेतस्थळावरन वाटत आहे. लिपिकार चा फुकट आणि विकत अशी दोन्ही versions आहेत. CDAC Leap नावाच सोफ्टवेअर पण पूर्वी मिळत असे. त्याच्यावरच काम पण बंद दिसतंय. मी काही वर्षान पुर्वी CDAC Leap वापरल होता, पण सध्या तरी लिपिकार आणि Google IME वापरतो आहे.

चित्र १: गुगल IME Auto Complete

मी हा ब्लॉग लिहायला Google IME वापरत आहे अणी ते उत्तम काम करत आहे. IME download आणि install करण अगदी सोप आहे. http://www.google.com/ime/transliteration/ वरन फाईल घ्या आणि ती run करा. IME नीट install झाल कि तुम्हाला बहुतेक करून स्क्रीन वर उजव्या हाताला खाली IME चा नवीन टूलबार दिसेल, किव्हा English – Marathi switch करायच बटन तरी दिसेल. चित्र २ पहा.

चित्र २: IME Toolbar

IME मध्ये भाषा बदलून मराठी करा आणि तुम्ही कुठल्या हि application मध्ये मराठी त्य्पे करू शकाल. IME मधली “auto complete” सुविधा खूप वेळ वाचावते. उधारण म्हणजे तुम्ही amit लिहिलत कि तो अमिताभ पर्येंत सल्ला देतो, चित्र १ पहा. असच सगळ्या शब्दांच्या बाबतीत होत.

जर तुम्ही संगणक क्षेत्रातल्या विषयावर किव्हा कुठल्याहि ‘technical’ विषया वर लिहीत असाल तर सारखेच इंग्रजी शब्द वापरायला लागतात. IME मध्ये तुम्ही भाषा सहज switch करू शकता ‘Alt+Space’ दाबून.

Google IME अजून तरी फक्त Windows वरच चालता. त्या मुलेय तुम्ही Linux किव्हा Apple Macintosh वापरात असाल तर Google IME वापरता येणार नाही. अश्या वेळी तुम्ही http://www.google.com/transliterate/Marathi वापरू शकता.  Google Transliterate मध्ये २२ भाषा लिहायची क्षमता आहे.

चित्र ३: 1गुगल इंग्रजी - मराठी ट्रांसलिटरेट
चित्र ४: गुगल इंग्रजी - मराठी शब्दकोश

टिप्स

  1. स्पेलिंग शुद्धलेखना बद्दल खात्री नसेल तर Google वर शोधून बघायच. बरोबर असेल तर बहुतेक वेळा search results येतात. नसेल तर येंत नाहीत.
  2. कुठला इंग्रजी शब्द अडत असेल तर Google इंग्रजी – मराठी शब्दकोशाचा वापर करा. उदहारण म्हणजे corresponding साठी सुसंगत हा मराठी शब्द आहे हेय मला सुचल न्हवत.
  3. कीबोर्ड कडे न बघता टायीप करायला शिका / प्रयत्न करा, खूप वेळ वाचेल.
  4. Help आणि User Guide नक्की वाचा. बरेच features आहेत जे लगेच नाही दिसत
  5. IME Auto Complete मध्ये Google चा लोगो क्लीक केलात तर त्या शब्दावर Google search आपोआप होत.
  6. असले features आणि Keyboard shortcuts शिकण आणि वापरण फारच महत्वाच आहे. कारण नाहीतर IME वापरायला अवघड जाईल आणि IME चा अधिकतम फायदा नाही होणार. सारख स्क्रीन वर क्लीक करण खूप वेळ खात. http://www.google.com/ime/transliteration/help.html#features वर shortcuts आणि features आहेत, ते वापरायच्या आधी नक्की वाचा.
  7. काही वेळा काही मराठी शब्द नाहीच जमत इंग्रजी मध्ये लिहायला. अश्या वेळी तुम्ही ‘char picker’ उघडून अक्षर निवडू शकता. ‘char picker’ च बटन Google IME toolbar मध्ये असत.चित्र २ आणि ४ पहा.
  8. तरी नाही जमला शब्द तर दुसरी कडून कॉपी पास्ते करा. मला software सॉफ्टवेअर लिहायला अजून नाही जमलाय. तेय मी कॉपी पेस्ट करतो आहे. Google var ‘फ्टवेअर’ search केल आणि मला बरोबर सॉफ्टवेअर सापडल
चित्र ५: Character Picker

तस तुम्ही IME vaprun कुठल्या हि application मध्ये मराठी लिहु शकता. पण IME नसेल वापरायच तर Gmail मध्ये सरळ मराठी ईमेल लिहिता येत, “Compose Mail” मधे, वरच्या menu मधे मराठी निवडल कि झाला. पण ब्लॉग करायला मला Google IME हे सोफ्टवेअर अधिक चांगल वाटत.

पहिल्या मराठी ब्लॉगसाठी एवढ खूप झाल. मला हा ब्लॉग लिहायला बरेच तास लागले आणि मी मराठी लिहून लिहून दमलो आहे 🙂 अशा आहे कि सुधारणा होईल माझा जरा हात बसल्या वर. सुरुवात तरी केली याचा आनंद आहे 🙂

मी शुद्धलेखन आणि व्याकरणाकडे आत्ता तरी फार काही लक्ष नाही दिलाय. लक्ष देऊन देखील फार उपयोग नस्ता झाला, कारण वाचल तरी चुकलाय हे कळायची शक्यता तशी कमीच होती. कृपया मी मराठी भाषेचा खून केलाय वगेरे अभिप्राय देऊ नका, ते मला माहित आहे :-). माझ्या चुका आणि काय सुधारणा करता येईल ते नक्की सांगा. धन्यवाद.

25 Comments

  1. Lipikaar does not transliterate! In fact, we encourage users to think & type in native. If you would like to give Lipikaar a try – it's live on http://lipikaar.com

  2. Thanks Santosh. I think one can write English alphabets in Lipikaar & it auto converts as per phonetics. So thought that was 'transliteration'. Perhaps I am mistaken. Will try out Lipikaar again.

  3. Prashant More

    सी-डैक मुंबई चे http://www.cdacmumbai.in/xlit/editor हे संपादक साधन (editor tool) ही तुम्ही वापरु शकता. तसेच हे वैयक्तिक वापरासाठी मुफ़्त मधे उपलब्ध आहे. तुम्ही जर उबुंतु किंवा डेबियन जर वापरत असाल तर http://www.cdacmumbai.in/xlit येथुन OpenOffice.org Writer (MS Word चा पर्यायी) साठीचे extension डाउनलोड करु शकता. आपल्या प्रतिक्रिया अवश्य पाठवा सुधारणाही सूचवा. धन्यवाद. kbcs [at] cdacmumbai {dot} in

  4. Hi Prashant. Good to know of xlit. Will try out. An Openoffice extension is a good idea.

  5. Prashant More

    Harshad, please check out and give some critical feedback about the outputs and also what additions would you like to have in it.

  6. सुरुवात तर छान झाली आहे. व्याकरण आणि शुद्धलेखन पण जमेल हळूहळू.

  7. Anil wakankar

    upkram khupch chhan ahe.mala phar bhavla
    anil wakankar

  8. Namita Waikar

    चिवचिव** वरून या तुझ्या ब्लोग परेंत पोचले. हे मी gmail मध्ये लिहून इथे कॉपी केलय.
    मस्तच आहे. आता IME वगरे प्रकार बघते वापरून.

    (** म्हणजे Twitter बरका!)

    • धन्यवाद. चिवचिव chi idea changli ahe. name pan catchy ahe 🙂

  9. ccy

    marathimadhun blogs aani email lihinyasaathi chhan mahiti ..

  10. Sulekha Bodas

    me pan marathi lihinyacha prayatna karena.

  11. Prakash Dongare

    सर,
       संगणक वापरकर्त्यांना मराठीतून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
     
     तुम्ही गुगल किंवा तत्सम आय्. एम्. ई. वापरताहेत हे तुम्ही लेखनात केलेल्या चुकांवरून लक्षात येते.  असो!
     
     गुगल किंवा तत्सम आय्. एम्. ई. वापरण्याऐवजी जर आपण  inscript कळफलक वापरलात तर एवढ्या चुका होणार नाहीत. त्यासाठी काही दिवस आपण सराव करावा. आपण ज्यावेळी विंडोज एक्स्. पी. लोड करतो , त्यावेळी संगणक आपल्याला भाषा आणि प्रदेश विचारतो. तेव्हाच आपण India => Marathi ऑप्शन निवडला तर हा inscript IME आपोआप लोड होतो. किंवा नंतरही Regional and Language  या पर्यायावर Start =>Control Panel मधून गेलात तरी हा IME लोड होईल. अर्थातच त्यासाठी Xp ची CDलागेल.
     
    जगभरात तुम्ही कोठेही गेलात तरी इंग्रजी IME प्रत्येक संगणकावर असतो. त्याप्रमाणे inscript IMEचे आहे. म्हणून तोच कळफलक layout वापरावा.

    मराठीसाठी मिळणाऱ्या  OT Font ची सुंदरता खूप कमी आहे. मी एक किलोबाईट जागा
    व्यापणारे एक सॉफ्ट्. तयार केले आहे. त्याने मराठी लेखन खूप सुंदर दिसते.
    मला ते सॉफ्ट्. महाजाळावर ठेवायचं आहे. कृपया मदत करावी.

    तसेच मला Blog तयार करावयाचा आहे. त्याची माहिती मराठीतून महाजाळआवर कोठे मिळेल. त्याची माहिती द्यावी.

    Prakash Dongare               email Add. phdongare@gmail.com
           
        

  12. Azim Taufique391

    सुरुवात तर छान झाली आहे. व्याकरण आणि शुद्धलेखन पण जमेल हळूहळू

  13. Girishunde

    Sahi re… khup madat zali tuzya blog chi marathi typing kartana…

    Dhanyawad… hardik shubhetcha…

  14. suryakant vaidya

    thanks,very nice

  15. vilassalmote

    संगणक वापरकर्त्यांना मराठीतून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद……..

  16. Sachin Kumbhojkar

    khup chan

  17. Poonam Hindupur-Sattigeri

    धन्यवाद. खूप चांगली माहिती पुरवलीत तुम्ही. मी मराठी मध्ये ब्लॉग लिहावा का याबद्दल विचार करीत होते. तेव्हा मराठी कसं type करायचं हे शोधात होते. तुमचा हा लेख वाचून मला हवी ती माहिती मिळाली.

Comments are closed